विनायक मेटे यांच्या पत्नीसाठी संभाजी राजे यांची मोठी मागणी
विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला आमदार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.;
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला आमदारकी देण्याची मागणी केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर माजी खासदार संभाजी राजे यांनी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार बनवण्याची मागणी केली आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घ्यावे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाकडून केली जात आहे. त्यातच कोल्हापुरचे संभाजी राजे म्हणाले की, शिवसंग्राम टिकवण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती मेटे यांना आमदारकी देण्याची मागणी केली आहे.
विनायक मेटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या बैठकीसाठी मुंबईला जात होते. दरम्यान अपघातात त्यांचे निधन झाले. तर विनायक मेटे यांच्या निधनाची चौकशी सीआयडीमार्फत करण्याची घोषणा मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यापार्श्वभुमीवर संभाजी राजे हे विनायक मेटे यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यानी मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर आमदार करावे, अशी मागणी केली.