शिवसेना आमदार अयोद्धा दौऱ्यातच फुटणार होते…

शिवसेना आमदार अयोध्या दौऱ्यात फुटणार होते. पण नेमकी घोड्याने पेंड कुठं खाल्ली? जाणून घेण्यासाठी वाचा...;

Update: 2022-07-25 03:44 GMT

शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर सुरत गाठली. मात्र, हा कार्यक्रम आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यानच होणार होता. शिवसेनेचे काही आमदार शिवसेनेला अयोध्या दौऱ्यातच जय श्रीराम करणार होते. मात्र, ऐनवेळेला उध्दव ठाकरे यांनी ठरावीक लोकांनाच अयोध्या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाचे आणि भाजपचे मिशन अयोध्या फेल ठरलं.

एकनाथ शिंदे यांचे उध्दव ठाकरे यांच्याबरोबर विधानपरिषद निवडणूकीच्या दरम्यान मतभेद झाले, अशी चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांबरोबर काही महिन्याअगोदरच डील केली होती. मात्र, उध्दव ठाकरे यांच्यामुळे तो प्लॅन फसला, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी मॅक्समहाराष्ट्राला दिली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आमदारांना अयोध्येला जाऊ दिलं नाही. अशी टीका उध्दव ठाकरे यांच्यावर आता केली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गटाचं उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे कारण म्हणजे आमदारांना अयोध्येला जाऊ न दिल्लीमुळे फेल ठरवलेले मिशन अयोध्या आहे.

दरम्यान भाजपचे काही नेते ठाकरे सरकार आज पडेल, उद्या पडेल हे सांगत होते. या नेत्यांना या प्लॅन ची काही कल्पना नव्हती. मात्र, हे सरकार पाडण्यासाठी भाजप काही करणार नाही. हे सरकार अंतर्गत कलहाने पडेल हे सांगणारे भाजप नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या काही महीन्यांपासून डील करत होते.

त्यांना या सगळ्या प्रकरणांची पुर्ण माहिती होती. किंबहूना हे नेते या सगळ्या मिशनमध्ये सहभागी होते,अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

Tags:    

Similar News