'धनुष्यबाण' आम्हालाच द्यावा लागेल, ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. एकनाथ शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वा. पर्यंत चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.;

Update: 2022-10-11 04:01 GMT

निवडणूक आयोगाने सोमवारी उध्दव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव मान्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मान्य केले आहे. त्याबरोबरच ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाचे चिन्ह सादर करण्यासाठी मंगळवारी सकाळी 10 वा. पर्यंत नवे चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले की, आमच्याकडून कागदपत्रं सादर करण्यात आली. आमच्याकडे 70 टक्के संस्थात्मक बहूमत आहे. त्याबरोबरच समोरून बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र आम्ही प्रतिज्ञापत्रासोबत बहूमताची आकडेवारीही सादर केली आहे. मात्र त्यांनी काहीच केले नाही आणि जी कागदपत्र सादर केली तीसुध्दा बनावट. त्यामुळे मुंबई पोलिसांनी बोगस प्रतिज्ञापत्र ताब्यात घेतले आहेत. यातून मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, निवडणूक आयोगाने मेरीटच्या आधारे आम्हाला धनुष्यबाण द्यावा. कारण धनुष्यबाण न मिळणे हा आमच्यासाठी धक्का असून तो आमच्यावरचा अन्याय असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. आमच्याकडे 70 टक्के संस्थात्मक बहूमत आणि 14 राज्य प्रमुखांचा पाठींबा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोगाने मेरीटच्या आधारे धनुष्यबाण आम्हालाच द्यायला हवा, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News