भाजपने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन फिरवला असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण आता राज ठाकरे यांनी यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्याच्या राजकाऱणात कधी एवढी गोंधळाची स्थिती असल्याची त्यांनी केली आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना काही सवाल देखील विचारले.
युती आणि आघाड्या करुन लोकांची मतं मिळवायची आणि निकालानंतर दुसऱ्यांबरोबर जायचे हा मतदारांचा विश्वासघात आहे या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय़ चार भिंतींमध्ये ठरला होता, तर तो जाहीर का केला नाही, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे.