शिवसेना सोडण्याबाबत राजन साळवी यांचा खुलासा

Update: 2022-08-19 08:13 GMT

शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी शिवसेना सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभुमीवर राजन साळवी यांनी शिवसेना सोडणार का? याबाबत ट्वीट करून भूमिका स्पष्ट केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील अनेक आमदारांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मात्र त्यानंतरही भास्कर जाधव, वैभव नाईक आणि राजन साळवे हे तीन आमदार उध्दव ठाकरे यांच्या सोबतीला आहेत. मात्र त्यातच राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजन साळवीसुध्दा शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर राजन साळवी यांनी खुलासा केला आहे.

राजन साळवी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आमची निष्ठा मातोश्री चरणी कायम आहे. काल आज आणि उद्या आमची निष्ठा फक्त शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच असल्याचे ट्वीट केले.

निष्ठेचे प्रमाणपत्र 15 ऑक्टोबर 2022 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. त्यामुळे मला खोक्याची गरज नाही, असं मत राजन साळवी यांनी ट्वीटमध्ये व्यक्त केले.

Tags:    

Similar News