दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर, शिंदे गटाने आता शिवसेनेच्या विविध कार्यालयावर आपला हक्क सांगायला सुरवात केली आहे. आज विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने अधिकृतपणे ताबा मिळवला आहे. शिंदे गटाचा आता कायदेशीर हालचालींना वेग आलेला पाहायला मिळाला आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कष्टातून आणि घाम गाळून शिवसेना हे नाव आणि शिवधनुष्य हे पक्ष चिन्ह नागरिकांच्या मनामनावर रुंजी घातले. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर शिंदे गटाने कायदेशीर हालचाली करण्यास सुरवात केली आहे. आज सकाळी विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतले. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले काही सहकारी आमदरांसोबत विधीमंडळात दाखल झाले आणि त्यांनी विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय अधिकृतपणे ताब्यात घेतले.
राज्याच्या विधीमंडळात सर्व पक्षांना कार्यालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्या कार्यालयाचा वापर हा पक्षातील आमदार आपल्या कामासाठी करतात. ठाकरे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी कायदेशिररित्या पक्ष कार्यालयात प्रेश घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आता ठाकरे गटाचे आमदार कुठे बसणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमात बसणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितेल आहे.