Live Update : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्याच्या Live Update वाचा...
1) मुख्य सरन्यायाधीशासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु
2) कपिल सिब्बल शिवसेना उध्दव ठाकरे गटासाठी प्रतिवाद करत आहेत
3)शिवसनेचे वकील - पक्षाने बजावलेल्या व्हीपविरोधात मतदान करणे हे १०व्या परिशिष्टाप्रमाणे नियमांचे उल्लंघन आहे
4) शिवसेनेचे वकील – अपात्र सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड केली आहे, ती निवडही अपात्र ठरते
5) शिवसेनेचे वकील – गुवाहाटीला जाण्याच्या एक दिवस आधी शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस एका अनधिकृत मेल आयडीद्वारे पाठवली, त्यानंतर वकिलामार्फत पत्र पाठवले
6) शिवसेनेचे वकील – सुप्रीम कोर्ट अंतरिम अपात्रतेचे आदेशही देऊ शकते
7) शिंदे यांचे वकील – पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये नेतृत्वाविरोधात आवाज उठवला तर अपात्र ठरवता येत नाही
8) शिवसनेचे वकील - पक्षाने बजावलेल्या व्हीपविरोधात मतदान करणे हे १०व्या परिशिष्टाप्रमाणे नियमांचे उल्लंघन आहे
9) शिवसेनेचे वकील – अपात्र सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड केली आहे, ती निवडही अपात्र ठरते
10) शिवसेनेचे वकील – बेकायदा पद्धतीने आलेले सरकार एकही दिवस अस्तित्वात राहणे योग्य नाही
11) शिवसेनेचे वकील – गुवाहाटीला जाण्याच्या एक दिवस आधी शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस एका अनधिकृत मेल आयडीद्वारे पाठवली, त्यानंतर वकिलामार्फत पत्र पाठवले
12) शिवसेनेचे वकील – दुसऱ्या गटात विलिनीकरण हाच मार्ग आहे, पण शिंदे गटाचे कोणत्याही पक्षात विलिनीकरण झालेले नाही
१३) शिवसेनेचे वकील - दुसऱ्या गटात विलीनकरण झालेले नसल्याने ते आमदार अपात्र
१४) शिवसेनेचे वकील – कोर्टाने विधिमंडळातून नोंदींची माहिती मागवून निर्णय घ्यावा
१५) शिंदे यांचे वकील – शिवसेनेत पक्षांतर्गत लोकशाहीच्या तत्वांना हरताळ फासला गेला आहे
१६) एकनाथ शिंदे यांच्यातर्फे हरिश साळवे यांचा युक्तीवाद
१७) शिंदे यांचे वकील – पक्षातील बहुसंख्य लोकांना दुसऱ्या व्यक्तीने नेत्वृत्व करावे असे वाटत असेल तर त्यात गैर काय?
१८) शिंदे यांचे वकील – आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी केली तरच अपात्र ठरवता येते
१९) शिंदे यांचे वकील – दुसऱ्या परिच्छेदाप्रमाणे सदस्याने स्वेच्छेने पक्ष सोडलेला असला पाहिजे किंवा व्हीपच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे
२०) शिंदे यांचे वकील – पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये नेतृत्वाविरोधात आवाज उठवला तर अपात्र ठरवता येत नाही
२१) शिंदे यांचे वकील – कोणत्याही लक्ष्मण रेषेचे उल्लंघन न करता पक्षात आपली भूमिका मांडणे ही बंडखोरी नाही
२२) शिंदे यांचे वकील – ज्या व्यक्तीला २० आमदारांचाही पाठिंबा नाही त्यांना मुख्यमंत्रीपदी ठेवणे योग्य आहे का?
२३) शिंदे यांचे वकील - दुसरी व्यक्ती मुख्यमंत्री होणे आणि नवीन सरकार स्थापन होणे ही बंडखोरी नाही
२४) शिंदे यांचे वकील – याचिकांवर कागदपत्रं सादर करण्यासाठी पुढील आठवड्यापर्यंत वेळ हवा
२५) सुप्रीम कोर्ट- वेळ देण्याचा प्रश्न नाही, पण काही घटनात्मक मुद्दे यामध्ये निर्माण झाले आहेत, त्यावर निर्णय होणं गरजेचे आहे
२६) सुप्रीम कोर्ट – अल्पमतातील पक्ष प्रमुखाला कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का?
२७) सुप्रीम कोर्ट – १० व्या सूचीमधील तिसरा परिच्छेद काढणे आणि पक्षातील फुटीबाबत स्पष्टता नाही, हे देखील मुद्दे महत्त्वाचे आहेत
२८ ) सुप्रीम कोर्ट – अल्पमतातील पक्ष प्रमुखाला कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का?
२९) सुप्रीम कोर्ट – १० व्या सूचीमधील तिसरा परिच्छेद काढणे आणि पक्षातील फुटीबाबत स्पष्टता नाही, हे देखील मुद्दे महत्त्वाचे आहेत
३० ) सरन्यायाधीश – महत्वाचे मुद्दे आहेत, मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करावे, असे मला वाटते
३१) सरन्यायाधीश – मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा आदेश दिलेला नाही, विचार सुरू आहे
३२) सरन्यायाधीश – गटनेत्याला काढण्याचा पक्षाला अधिकार आहे. पण सदस्यांना गटनेता निवडण्याचा अधिकार
३३) सरन्यायाधीश – गटनेत्याबाबत वाद निर्माण झाल्यास विधानसभा अध्यक्षांनी निर्वाळा देणे गरजेचे आहे
३४)शिवसेनेचे वकील – बंडखोर आमदारांना बैठकीसाठी व्हीप बजावला होता, पण ते बैठकीला आले नाही
३५ ) दोन्ही बाजूंना आपले म्हणणे लिखित स्वरुपात सादर करण्यासाठी कोर्टाने १ ऑगस्टपर्यंत मुदत दिली
३६)शिवसेनेचे वकील – पुढील सुनावणीपर्यंत स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश द्यावेत
३७)घटनापीठाकडे वर्ग करण्यासाठीचे मुद्दे पुढील बुधवारपर्यंत सादर करण्याचे आदेश
३८)दोन्ही बाजूंना आपले म्हणणे लिखित स्वरुपात सादर करण्यासाठी कोर्टाने १ ऑगस्टपर्यंत मुदत दिली