बंडखोर आमदार भरत गोगावले यांचे शिवसैनिकांना आवाहन
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी नेमणूक केलेले प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून शिवसैनिकांना आवाहन केले आहे. त्यामध्ये त्यांनी पराभूत आमदारांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकदाही भेट न घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.;
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या बंडामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच बंडखोर आमदार भरत गोगावले यांची एकनाथ शिंदे यांनी प्रतोद म्हणून निवड केली आहे. त्यापार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही निवड फेटाळली आहे. दरम्यान बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
त्यामध्ये भरत गोगावले म्हणाले की, 2019 च्या निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकदातरी भेट घेतली आहे का? जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदारांसह पराभूत उमेदवारांनाही निधी देऊन ताकद देत होते. त्यावेळी शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराची साधी बैठकही घेतली नाही, असा गंभीर आऱोप केला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार तथा मुख्य प्रतोद श्री.भरतशेठ गोगावले यांची रोखठोक भूमिका #WeSupportEknathShinde@BharatGogawale pic.twitter.com/05sNkDSyAU
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
पुढे भरत गोगावले म्हणाले की, एकूणच शिवसेनेचे खच्चीकरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुढे जात होता. या सर्व कठीण परिस्थितीत एकनाथजी शिंदे आम्हा सर्व शिवसेना आमदारांना आधार दिला. आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातरच एकनाथजी शिंदे यांनी शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या हितासाठी ही भूमिका घेतली आहे.