जहालत एक किस्म की मौत है, संजय राऊत यांचं नवं ट्वीट
राज्यात सत्तानाट्याच्या सहाव्या दिवशीही शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.;
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यामुळे सरकार अडचणीत असतानाच संजय राऊत यांना ED चे चौकशीसाठी समन्स आले आहे. तसंच बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी नवं ट्वीट करून बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे,
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच शिवसेना कुणाची यासाठी शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे गट असा संघर्ष रंगला आहे. तर शिवसेनेच्या दोन गटातील लढाई रस्त्यासह न्यायालयातही लढली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर हा संघर्ष तीव्र होत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आणखी एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे.
संजय राऊत हे बंडखोर आमदारांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यातच दोन दिवसापुर्वी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यावर काल दिवसभर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र त्यानंतर आज पुन्हा संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी शेर ट्वीट करत म्हटले आहे की, जहालत एक किस्म की मौत है और जाहिल लोग जलती फिरती लाशे है.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 28, 2022