बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत यांचा दीपक केसरकर यांना टोला

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावरून बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;

Update: 2022-06-27 04:22 GMT

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. तर शिंदे गटाविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यासह बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. त्यावरून दीपक केसरकर यांनी टीका केली. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी बाप बदलण्याची भाषा कोण करतंय असं म्हटलं आहे. त्याबरोबरच संजय राऊत पुढे म्हणाले की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!, असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात म्हटले की, पानटपरीवाल्याला मंत्री केले असं म्हणत बंडखोर आमदारांचा बाप काढला. त्यावर दीपक केसरकर यांनी टीका केली होती. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.



Tags:    

Similar News