एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर कर्नाटकच्या आमदाराने उध्दव ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटाने केला आहे. त्यानुसार त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावाचा नवा गट स्थापन केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊन सरकार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान कर्नाटकच्या आमदाराने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे.
कर्नाटकचे काँग्रेस नेते डी के शिवकुमार म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी संघटनेची बांधणी तळागाळातून केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसत आहे. ते या सर्व प्रकरणातून नक्की मार्ग काढतील. याबरोबरच पक्ष कायम ठेवण्यासाठी सरकार टिकणे महत्वाचं आहे. त्यामुळेच आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून डी के शिवकुमार यांच्यासोबत असल्याचे मत डी के शिवकुमार यांनी व्यक्त केले.
शिंदे गटाचे नाव ठरलं?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं ठेवलं आहे. मात्र शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याचा अधिकार नसल्याची टीका शिवसेनेने केली आहे.