Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, वाचा युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे

Update: 2023-02-21 14:53 GMT

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. यामध्ये आजपासून तीन दिवस मेरिटच्या आधारे सुनावणी होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर कपिल सिब्बल यांनी पहिल्या दिवशी जोरदार युक्तीवाद केली. त्यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी वाचा...

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील १० महत्त्वाचे मुद्दे

1) घटनेची १० वी अनुसूची आणि विधिमंडळातील पक्षाच्या भूमिकेचे अर्थ लावणे आवश्यक आहे. आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे? याला पक्षातील फूट म्हणता येईल का? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.

2) आमदारांची संख्या जास्त असल्याने आम्हीच खरा पक्ष असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्यात आले. राज्यापालांनी त्यांना शपथही दिली. राज्यापालांचे अधिकार काय? असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

3) अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका गटाला चिन्ह कसे देऊ शकते? असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली आहे.

4) संविधानाच रक्षण करणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षात राज्यपाल देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत असल्याचं दिसून येत आहे. हे दुर्देवी आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

5) बहुमत आहे की नाही हे न बघता राज्यापाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.

6) पक्षांतील बंडखोरीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

7) बहुमत असणारे आसाममध्ये बसून नवीन नेता कसा निवडू शकतात? न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वी हे सर्व घडत होते. यासंदर्भात कोणतीही पक्षाची बैठक झाली नव्हती – कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

8) विधासभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे. नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिंदे गटाच्या वकिलांनीही उत्तर दिलं आहे. शिंदे गटाला वगळल्यानंतर नार्वेकरांना निवडीसाठी आवश्यक ती मतं मिळाली असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात चर्चा सुरू आहे.

9) अध्यक्षांची निवड चुकीची असेल तर त्यांना अधिकार नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

10) असंविधानिक गोष्टी थांबल्या नाहीत, तर भविष्यात अनेक प्रकरण पुढे येतील, असही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

11)घटनेची १० वी अनुसूची आणि विधिमंडळातील पक्षाच्या भूमिकेचे अर्थ लावणे आवश्यक आहे. आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे? याला पक्षातील फूट म्हणता येईल का? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.

12) आमदारांची संख्या जास्त असल्याने आम्हीच खरा पक्ष असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्यात आले. राज्यापालांनी त्यांना शपथही दिली. राज्यापालांचे अधिकार काय? असा सवाल उपस्थित केला.

13) अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका गटाला चिन्ह कसे देऊ शकते?

14) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे का? असा प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारला. त्यावर सिब्बल यांनी होकारार्थी उत्तर दिलं. तसेच न्यायालयाने राणा प्रकरणात अशाप्रकारे आमदारांना अपात्र ठरवल्याचं नमूद केलं.

15) तुम्ही म्हणता तसं विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेता येणार नाही असं म्हटलं, तर दहाव्या सुचीप्रमाणे अध्यक्षांना जो व्यवस्थात्मक अधिकार दिलाय त्या अधिकारात आम्हाला बदल करावा लागेल : सरन्यायाधीश

16) कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

17) अडीच वर्ष सत्तेत असताना प्रश्न उपस्थित केले नाही.

19) एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास तुम्ही मंत्री होऊ शकत नाही. आता त्यांची अपात्रता न्यायालयासमोर, स्पीकरसमोर प्रलंबित आहे. आणि तुमची मंत्रिपदावर नियुक्ती झाली आहे?

20) एखाद्या राज्यातील लहान पक्षाने दुसऱ्या मोठ्या पक्षात विलीन होऊन नवा पक्ष स्थापन केला तर तो त्याचा मूळ राजकीय पक्ष बनतो.

21) सार्वजनिक जीवनात नैतिकता जपायची असेल तर तुम्हाला कोणतेही पद दिले जाणार नाही. राज्यपाल पद नाही, मोबदला देणारे पद नाही, यावर उपाय करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाच वर्षांचा कालावधी सार्वजनिक ठिकाणी नियुक्ती नको.

22) पक्षात फूट पडली आहे, असे ते म्हणू शकतात का? यासाठी दहाव्या परिशिष्टमधे आणि विधिमंडळातील पक्षाच्या भूमिकेचा अर्थ लावणे आवश्यक आहे. पक्षाच्या चिन्हावर आमदार निवडून येतात. पक्षामुळे ते तिथे आहेत.

23) या 40 लोकांना दहाव्या शेड्यूलमध्ये कोणताही बचाव नाही. विलीनीकरण झाल्याचा त्यांचा दावा नाही. विधानसभेत त्यांचे बहुमत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते व्हीप बदलू शकतात, असा त्यांचा दावा आहे. तर त्यांचा नेता एकनाथ शिंदे स्वतःला मुख्य नेते म्हणवतात. कारण ते ४० पैकी एक आहेत.

24) राजकीय पक्षाचे काय होते? ते म्हणतात मी काहीही करू शकतो. मी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, मी गुवाहटीला जाऊ शकतो. दहाव्या शेड्यूलच्या कोणत्या तरतुदीनुसार ते बचाव करू शकतात? १० वे शेड्यूल त्यांना संरक्षण देत नाही.

25) तुम्ही सरकार अस्थिर करू शकत नाही. तुम्ही न्यायालयीन आदेशानुसार काही कृत्ये कायम ठेवल्यास, तुम्ही पक्षांतर सक्षम करत आहात. याचे दूरगामी परिणाम देशावर होत आहेत, असं कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News