संजय राऊत : या मला अटक करा…

Update: 2022-06-27 07:54 GMT

एकनाथ शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल आहे. १६ आमदारंच्या अपात्रते संदर्भात याचिकेवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पण दुसरीकडे आता केंद्र सरकारने शिवसेने भोवतीचा EDचा फास आणखी आवळला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना ED ने मंगळवारी हजर होण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. गोरेगाव येथील पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात EDने याधीही संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. याच प्रकरणी आता संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.

दरम्यान EDच्या नोटीशीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!"

असे आव्हानच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत दिले आहे.


Tags:    

Similar News