गृहमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना पाडले तोंडघशी?
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे पोलिस संरक्षण काढले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केला होता. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे पोलिस संरक्षण काढले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केला होता. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच बंडखोर आमदारांवर टीका केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. तर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला गृहमंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे.
राज्याच्या गृह खात्याने पत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकारने बंडखोर आमदारांची कोंडी करायला सुरूवात केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड करून सरकारला आव्हान दिले आहे. त्यातच शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शिंदे गटाची कोंडी करण्यास सुरूवात केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या मागणीपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात येत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.
गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आताही शिवसेनेचे खच्चीकरण सुरू असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे संरक्षण काढले जात असल्याचा आरोप करतानाच या ट्वीटमध्ये आमदारांच्या सह्यांची यादी जोडली आहे.