शिवसेनेचे किती खासदार संपर्कात? एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.;

Update: 2022-07-19 03:35 GMT

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली. तर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांना काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन दिले जात होते. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांनी भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली होती. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी बोलवलेल्या बैठकीला 5 खासदार उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेतील खासदारांचा मोठा गट शिंदे गटाला पाठींबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी रात्री ऊशीरा बैठक घेतली. यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला हसून उत्तर दिले.

यावेळी एकनाथ शिंदे यांना विचारले की, शिवसेनेच्या खासदारांचा तुम्हाला पाठींबा आहे का? त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतांना हसून म्हटले की, आम्हाला शिवसेनेच्या खासदारांचा पाठींबा आहे. तो फक्त 12 खासदारांचाच नाही तर शिवसेनेच्या 18 खासदारांचा आम्हाला पाठींबा असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्या दाव्यामुळे ठाकरे सेना गॅसवर गेली असल्याचे म्हटले जात आहे. तर एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर आमदारांपाठोपाठ नगरसेवक व सामान्य शिवसैनिकांचा पाठींबा मिळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी(Bhavana gavali) यांनी भाजपला पाठींबा देण्याची मागणी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. त्यापाठोपाठ शिवसेनेचे आनंदराव आडसूळ, राहूल शेवाळे (Rahul shewale), राजेंद्र गावित यांनीही भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) यांना पाठींबा दिला होता. मात्र त्यानंतरही शिवसेनेच्या खासदारांनी शिंदे यांच्या ऑनलाईन बैठकीला हजेरी लावल्याचे वृत्त आहे. तर शिवसेनेच्या 12 नाही तर 18 खासदारांचा पाठींबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Tags:    

Similar News