विस्ताराआधीच सुधीर मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री?

Update: 2022-07-30 12:35 GMT

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या मुंबई बाबतच्या वक्तव्यावरुन आधीच वाद सुरू आहे. त्यात आता राज्यपालांनी शुक्रवारी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सत्तासंघर्षाचा कायदेशीर पेच कोर्टात असल्याने विस्तार रखडल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच आपली वर्णी लागावी यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहे.


 



यासर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी अंधेरीत एका चौकाच्या नामकरण सोहळ्याचा फोटो ट्विट केला. यामध्ये त्या चौकाला दिवंगत शांतीदेवी कोठारी यांचे नाव दिल्याचे दिसते आहे. पण त्याचबरोबर त्या चौकाच्या बोर्डावर प्रमुख पाहुणांच्या यादीत आमदार सुधीर मुनगंटीवर, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र सरकार असे लिहिले असल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

मुळात अजून मंत्रिमंडळाचा विस्ताराचा कोणताही मुहूर्त नसताना सुधीर मुनगंटीलवार यांच्या नावापुढे आयोजकांनी कॅबिनेट मंत्री का लिहिले अशी चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


Tags:    

Similar News