'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान'वाल्या महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ कालपासून बंद...

'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान' अशा जाहीराती करत प्रगतीची ग्वाही देणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे (Maharashtra Government) संकेतस्थळ कालपासून बंद पडले असून ऑनलाईन सेवेचा बोजवारा उडाला आहे. वेबसाईटवर भेट देणाऱ्या नागरीकांना सर्व्हरमध्ये दोष असल्याचे संदेश मिळत असून ४८ तास उलटूनही 'काही मिनिटे' संपतच नाहीत अशा नागरीकांच्या संतप्त प्रतिक्रीया येत आहेत...

Update: 2023-03-29 08:09 GMT

राज्यात सत्तापरीवर्तन होऊन आठ महीने उलटले आहेत. नुकतेच विधीमंडळाचे आधिवेशन देखील पार पडले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे डबल इंजिनचे सरकार असल्याचे प्रगतीने वेग पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. गेले काही दिवस राज्य सरकारकडून वर्तमानपत्रे, वृत्तवाहीन्या आणि जाहीरात फलकांमधून 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान' असे सांगत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो झळकत आहेत. नुकताच सावरकरांवरुन वाद निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खास पत्रकार परीषद घेऊन निषेध नोंदवला आहे.

महाराष्ट्र सरकारचे https://www.maharashtra.gov.in/App_Error.aspx?ExceptionId=76760362 हे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याचे मंत्रिमंडळ तसेच शासनाच्या विभागांची माहीती आहे. त्याचबरोबर आपले सरकार आणि शासन निर्णयांच्या लिंक आहेत. कालपासून महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या नागरीकांच्या पदरी निराशा येत आहेत. वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईट ओपन होत नाही.

दिर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर `सर्व्हरमध्ये तात्पुरता दोष उद्भवला आहे, त्यामुळे आपली विनंती पूर्ण होऊ शकत नाही. कृपया काही मिनिटांनंतर पुन्हा प्रयत्न करा. तुमच्यासमोर अजूनही हा दोष उद्भवत असल्यास कृपया सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटरला त्याबाबत कळवा. असा संदेश येतो. परंतू सर्व्हरमध्ये दोष... आणि 'काही मिनिटे' संपतच नाहीत... असा गेल्या ४८ तासाचा अनुभव आहे. :'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान'वाल्या महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ बंद पडल्याने सोशल मिडीयावर तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे.

Tags:    

Similar News