महत्त्वाची घोषणा: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका अखेर स्थगित
Maharashtra: Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections postponed due to COVID-19;
कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे. त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. Election Commission
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला होता. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही सर्व लोकप्रतिनिधींनी निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत अशी मागणी केली होती. या बाबत सुप्रीम कोर्टातही याचिका करण्यात आली होती परंतु कोर्टाने हा निर्णय आयोगाने घ्यावा असं सूचित केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांशी बोलु आणि पत्र लिहून अशी घोषणा देखील विधिमंडळात केली होती.
(Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections postponed due to COVID-19 Election Commission)
मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. 5 Zilla Parishads and 33 Panchayat Samitis postponed due to COVID-19
सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.