इच्छुक नेत्यांना सुखद धक्का देण्यासाठी उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार?

राज्याच्या राज्यपालपदी नव्याने रमेश बैस यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यात आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.;

Update: 2023-02-25 07:14 GMT


आगामी विधीमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र याबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. २६ फेब्रुवारीला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. अशी अटकळ सुद्धा लावली जात आहे. या विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी राजभवनात राज्यपालांची भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी नव्याने नियुक्त झालेल्या राज्यपालाचे अभिभाषण होणार आहे.

अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत एकत्रितरित्या चर्चा आणि भेट झाली नसल्याचे बोलले जात आहे. आज ही भेट आणि चर्चा झाली तर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आज शिंदे आणि फडणवीस यांची भेट झाल्यावर नक्की मंत्रिमंडळ विस्तावार चर्चा होणार की. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संयुक्त सभागृहासमोर राज्यपालांनी द्यावयाच्या भाषणासंदर्भात चर्चा होईल, याबाबतही अनिश्चितता आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने २६ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. त्यावर आज शिंदे-फडणवीस यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Tags:    

Similar News