राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करा, महाराष्ट्र काँग्रेसचा प्रस्ताव

Update: 2022-09-19 12:43 GMT

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या निवडणुकीबाबत एक महत्त्वाची घडामोड आता घडली आहे. काँग्रसचे अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी केरळमध्ये आपण अध्यक्ष होणार की नाही याचा निर्णय़ घेतला आहे फक्त तो अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कळेल असे म्हटले होते.

पण आता या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदी खासदार राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रस्ताव मांडला होता. तर प्रदेश कार्याध्यक्ष, चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण त्यानंतर कोणताही निर्णय न झाल्याने सोनिया गांधी यांना पुन्हा अंतरिम अध्यक्ष करण्यात आले होते. आता राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत राहुल गांधी काय निर्णय़ घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News