नाना पटोले यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट, काय घडलं बैठकीत?
महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांची भेट घेतली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर नाना पटोले यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज कॉंग्रेस च्या दिल्लीतील शिर्षस्थ नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
विधानपरीषद निवडणूकीत कॉंग्रेस च्या काही आमदारांनी
क्रॉस मतदान केल्याचा रिपोर्ट नाना पटोले यांनी दिल्याचं समजतंय. तसंच कॉंग्रेस हायकमांड ने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.
कॉंग्रेस चे ११ आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या विश्वासमत ठरावावेळी अनुपस्थित होते.
यापैकी ७ आमदार असे आहेत की ज्यांनी विधानपरिषदेला क्रॉस मतदान केलं होतं तसंच एकनाथ शिंदे यांच्या विश्वास मत ठरावाला देखील अनुपस्थित होते.
अशा आमदारांवर कारवाई होणार आहे.
तसंच आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर कॉंग्रेस ची काय भूमीका असेल यावर ही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.