Exclusive : गुलाबराव पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुलाबराव पाटील हे बंडानंतर आपल्या गावी पहिल्यांदाच दाखल झाले. यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांना दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.;
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुलाबराव पाटील हे बंडानंतर आपल्या गावी पहिल्यांदाच दाखल झाले. यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांना दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाळधी या त्यांच्या गावी पोहोचले. बाळासाहेबांच्या विचारांची आपलीच शिवसेना खरी असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही आम्हालाच मिळेल असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. दूर गेलेल्या नाराज शिवसैनिकांना आपण लवकरच भेटणार आहोत खरी आणि शिवसेना पुन्हा उभी करायची असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.