दादरमधील सिद्धी विनायक मंदिर आणि सावरकर रस्त्याच्य़ा कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार निधी मागितला होता, पण त्यांनी निधी दिला नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ८-१० दिवसातच निधी मंजूर झाला, अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. एवढेच नाही तर आपल्या मतदारसंघाला निधी नाकारला जात असताना शेजारी असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाला मात्र निधी दिला जात होता, असाही आरोप त्यांनी केला आहे.