महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने... संजय राऊत यांचं ट्विट
राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात केलेल्या बंडामुळे अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. निकालांनंतर 'नॉट रिचेबल' येणारे एकनाथ शिंदे हे इतरआमदारांसोबत सुरत मद्ये थांबले होते . यानंतर 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीच प्रतारणा करत नाही आणि करणार पण नाही .आम्ही शिवसेना सोडलेली नाही.'असे एकनाथ शिंदे यांनी मत मांडलं होत.
पण एकनाथ शिंदेंच्या नाराजीबद्दल चर्चा करण्यासाठी मविआ सरकारच्या सभेला पण शिंदेनी हजेरी लावली नाही. सध्या ते गुवाहाटी मद्ये असल्याची चर्चा आहे. या २ दिवसांच्या नाट्यावर भाष्य करत संजय राऊत यांनी "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..."असं ट्विट केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
त्याचबरोबर जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल ,पण नाराज एकनाथ शिंदे हे आमच्यासोबतच राहतील .ते एक कट्टर शिवसैनिक आहेत.आम्ही त्यांना सोडू शकत नाही आणि ते आम्हाला सोडू शकणार नाहीत. ते शिवसेनेतच राहतील आणि संपूर्ण आयुष्य शिवसेनेतच काढतील ,असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.