विधानपरिषद निवडणूकीत सेनेचे आमदार सांभाळा, किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा

Update: 2022-06-18 07:09 GMT

राज्यात विधानपरिषद निवडणूकीची धामधूम सुरू आहे. भाजपकडून राज्यसभा निवडणूकीची पुनरावृत्ती करण्याचा तर महाविकास आघाडीसमोर आपले चारही उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे.

विधानपरिषद निवडणूकीवरून राज्यात वातावरण तापायला सुरू झालेले आहे. त्यातच 20 जून रोजी विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या आमदारांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विधानपरिषद निवडणूकीत सेनेचे आमदार सांभाळा असा इशाराच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

राज्यसभा निवडणूकीची विधानपरिषद निवडणूकीत पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच शिवसेनेने आपल्या आमदारांना एकत्र करून वेस्टीन हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यापार्श्वभुमीवर महाविकास आघाडीची मतं फुटतील आणि भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी असाच दावा करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

शिवसेनेकडून अपक्ष आमदारांचा महाविकास आघाडीला पाठींबा राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आधी सेनेचे आमदार सांभाळावेत आणि नंतर अपक्ष आमदारांचं पहावं. कारण राज्यसभा निवडणूकीत पक्षाचा व्हीप दाखवावा लागला मात्र आता विधानपरिषद निवडणूकीत गुप्त मतदान आहे. त्यामुळे सेनेचे आमदार फुटण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, राज्यसभा निवडणूकीत ठाकरे सरकारच्या माफीया सेनेचे नाक कापले. आता विधानपरिषद निवडणूकीत त्यांचे कपडे उतरवू नये म्हणजे मिळवलं, असा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला.

किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत हा भित्रा आणि ढोंगी आहे. मी त्यांचे घोटाळे काढले आहेत. त्यानंतर त्यांची 14 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाली. त्यानंतर मी उध्दव ठाकरे यांच्या एकोणवीस बंगल्यांचा घोटाळाही काढला असल्याचे सांगितले. मात्र उध्दव ठाकरे फक्त धमकावण्याचेच काम करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Tags:    

Similar News