रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ; किरीट सोमय्यांनी दिला इशारा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्याबाबत आरोप केले होते.त्यातच आता पुन्हा एकदा रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यासंदर्भात किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत.;
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्याबाबत आरोप केले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच आता पुन्हा एकदा रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यासंदर्भात किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील कोर्लई गावात १९ बंगले आहेत, असे विधान किरीट सोमय्यांनी केले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी सोमय्यांनी केलेल्या विधानावर कोर्लई गावाचे सरपंच यांनी स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली होती. त्या पाहणीदरम्यान नाराळाची झाडे, गुरांचा गोठा, विहरी, पंप, पाण्याच्या टाक्या, इत्यादी आढळून आले होते. त्यामुळे रश्मी ठाकरे यांचे बंगले गेले कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत किरीट सोमय्यांवर टीका केली होती. त्यामुळे शिवसेना विरुध्द भाजप संघर्ष रंगला होता.
त्यावेळी किरीट सोमय्यांनी अदृश्य बंगले शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंच्या विरोधात आक्रामकता दाखवत १९ बंगल्यांच्या प्रकरणांवर मुद्दा उपस्थित करुन रश्मी ठाकरे यांच्यावरती गुन्हा नोंद करणार असल्याचे माहिती ट्वीट करून दिली आहे. तसेच रश्मी ठाकरे यांच्या बचावासाठी कागदपत्र गहाळ करण्यात आले असल्याचे आरोप किरीट सोमय्यांनी केले आहेत. तसेच सोमय्या आज रेवदंडा पोलिस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या संबंधित जागेवर बंगले असल्याचे कागदोपत्री माहिती आहे, परंतू सरपंच यांच्या म्हणण्यानुसार त्या जागी बंगले नाहीत. त्यामुळे ते बंगले गेले कुठे? असा सवाल उपस्थित करीत किरीट सोमय्या यांनूी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.