किरीट सोमय्या यांना तंबी? उद्धव ठाकरेंवरील आरोपसत्र थांबले?

Update: 2022-07-14 14:51 GMT

राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन होताच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांचे सत्र काहीसे थंडावले आहे. यासंदर्भात दिल्लीत पोहोचलेल्या किरीट सोमय्या यांनी पत्रकारांनी थेटच प्रश्न विचारला तेव्हा किरीट सोमय्या यांनी थेट उत्तर दिले आहे.

मला कोणीच तंबी देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया, सोमय्या यांनी दिली आहे. पण जी व्यक्ती दोषी असेल त्याला तुरुंगात जावे लागेल.संजय राऊत देखील वाचणार नाही त्यांना देखील जामीन घ्यावा लागला आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी दिल्लीत आलो आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

किरीट सोमय्या यांनी आता उद्धव ठाकरे यांच्याबाबतची भाषा बदलावी यासाठी त्यांना पक्षाकडून तंबी देण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिली होती. यासंदर्भात किरीट सोमय्या यांना विचारले असता किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही, पण कारवाई सुरूच राहणार असे संकेत दिले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत राहणार असे सांगितले आहे.

Full View

Tags:    

Similar News