Korlai : गावकऱ्यांच्या आक्रमकपणामुळे किरीट सोमय्या यांना घेतला काढता पाय

रश्मी ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्याच्या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावाला भेट दिली. यावेळी गावकरी आक्रमक झाले होते.;

Update: 2023-04-18 03:26 GMT

Raigad News : उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावे रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात 19 अनधिकृत बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यातच आता पुन्हा किरीट सोमय्या यांनी सोमवारी कोर्लई गावाला भेट दिली. मात्र यावेळी किरीट सोमय्यांना गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

रायगड जिल्ह्यातील मुरुड (Murud) तालुक्यातील कोर्लई (Korlai) गावात ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावाने 19 बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित बंगले जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. याप्रकरणी तत्कालीन सरपंच, सदस्य व शासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले, तर माजी सरपंच प्रशांत मिसाळ (Prashant Misal Arrest) यांना अटक झाली होती. हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे, किरीट सोमय्या नाहक कोर्लई गावाची बदनामी करीत आहेत, असा आक्रमक पावित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे किरीट सोमय्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

सोमवारी किरीट सोमय्या कोर्लई याठिकाणी कोर्लई जमीन व्यवहार प्रकरणी आले होते. मात्र किरीट सोमय्या राजकीय हेतूने सुडाने आरोप करीत असल्याचे कोर्लई ग्रामस्थांनी म्हटले. किरीट सोमेया यांनी 19 बंगले दाखवावेत, असे आवाहन ग्रामस्थांनी केले. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे किरीट सोमय्या यांनी माघार घेतली.

आतापर्यंत काय घडलं?

रेवदंडा (Revdanda) येथील ग्रामविस्तार अधिकारी यांनी पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच पोलिसांनी कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली. ही कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणातील मोठी कारवाई मानली जात आहे. त्यातच मिसाळ यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने मिसाळ यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

रश्मी उध्दव ठाकरे आणि अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तसेच सोमेया कोर्लई ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद रायगड याठिकाणी सतत येऊन या प्रकरणी कारवाईची मागणी करीत होते.

“रश्मी ठाकरे यांच्या कथित जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.

Tags:    

Similar News