यामिनी जाधव, प्रताप सरनाईक यांच्याबाबत किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केली भूमिका
राज्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर किरीट सोमय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्यातील मुख्यमंत्र्यांचं माफिया राज्य संपल्याने नव्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने कोणत्याही परिस्थितीत पाडले जाणारच, असा विश्वास व्यक्त केला. याबरोबरच यामिनी जाधव, प्रताप सरनाईक यांच्यासह बंडखोर आमदारांविरोधात ईडीकडे केलेल्या तक्रारी मागे घेणार का? असा प्रश्न विचारला असता कोणतीही तक्रार मागे घेणार नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.