मेट्रो कारशेडबाबत किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर प्रथमच मेट्रो कारशेड आरे येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्यभरातून आऱे वाचवा अशी मोहिम सुरू झाली. दरम्यान आदित्य ठाकरे यांनीही या मोहिमेला पाठींबा दिला. त्यावरून किरीट सोमय्या यांनी कारशेडबाबत गंभीर आऱोप केला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो कारशेडबाबतचा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द करून मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच करण्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर राज्यभरातून आरे वाचवा मोहिम सुरू झाली. या मोहिमेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही पाठींबा दिला. मात्र या कारशेडबाबत महाविकास आघाडी सरकारने सुरूवातीला अहवाल दिला होता. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
तसेच किरीट सोमय्या म्हणाले की, कांजुरमार्ग येथे तीन कारशेड करण्यात येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र कांजुरमार्ग येथे तीन कारशेड होऊ शकत नसल्याचा अहवाल महाविकास आघाडी सरकार असताना देण्यात आला. याचा अर्थ आदित्य ठाकरे यांच्याकडून लोकांची दिशाभूल केली जात असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली.
याबरोबरच हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिवसेनेच्या खासदारांची 'भावना' आहे. त्यामुळेच त्यांनी शिवसेना नेतृत्वाकडे द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची विनंती केली आहे, असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले.