भारतीय अर्थव्यवस्था (indian Economy) सुधारण्यासाठी रुपयावर देवी-देवतांचे फोटो लावण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. मात्र त्यावरून भाजप आणि आपमध्ये चांगलीच जुंपली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रुपयामध्ये (Rupee falling down against dollar) सातत्याने घसरण होत आहे. त्यापार्श्वभुमीवर अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रुपयावर श्रीगणेशाचा (Shriganesha) आणि लक्ष्मी (lakshmi) देवीचा फोटो लावण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्र सोडले आहे.
भाजप प्रवक्ते सांबित पात्रा (BJP spokeperson sambit patra) यांनी म्हटले आहे की, जे केजरीवाल हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या स्वास्तिक चिन्हावर झाडू मारणार म्हटले होते. ते केजरीवाल आता रुपयावर देवी-देवतांचे फोटो लावण्याची मागणी करत आहेत. तसेच केजरीवाल यांनी रुपयावर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो लावण्याची मागणी करण्यापेक्षा त्यांचे भाऊ आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी ज्याप्रमाणे दारु व्यवसायातून पैसा कमवला. तो पैसा परत केला आणि दिल्लीतील भ्रष्टाचार थांबवला तर अर्थव्यवस्था उभारी घेऊ शकते, असं मत भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांनी व्यक्त केले.