कसबापेठ, चिंचवड पोटनिवडणुसाठी भाजपा उमेदवारांची घोषणा... लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला संधी

Update: 2023-02-04 08:32 GMT

 पुण्यातील कसबा विधानसभा मतदार (asembly) संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न असला तरी महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. आता पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत.

भाजपाकडून पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कसब्यातून कॉंग्रेस तर चिंचवडमधून राष्ट्रवादी निवडणुक लढणार आहे.

विधानपरीषद पदवीधर आणि शिक्षक मतदारासंघात आघाडीला यश मिळाल्याने आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही निवडणुक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags:    

Similar News