कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

Update: 2023-01-19 07:19 GMT

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे कसबा पेठ (Kasaba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission of india) कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.




 


पुणे (Pune) जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 31 जानेवारी 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज करण्यात येणार आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाणणी होणार असून 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी रंगणार आहे.

Tags:    

Similar News