कसबा आणि चिंचवड जिंकण्यासाठीचा प्लॅन संजय राऊत यांनी केला उघड

Update: 2023-02-05 11:04 GMT

मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कशा पध्दतीने दोन्ही जागा जिंकणार याचा प्लॅन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उघड केला.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहीले आहे. त्यापार्श्वभुमीवर ही निवडणूक कशी जिंकायची? याबाबत संजय राऊत यांनी प्लॅन सांगितला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण कुणी गढूळ केले? याचाही विचार व्हावा.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील राजकीय वातावरण गढूळ होत असल्याचे सांगितले होते. त्यावर हे वातावरण चांगलं करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र अजूनही त्यांचे प्रयत्न पुढे गेले नाहीत. एवढंच नाही तर कसबा पोटनिवडणूकीसाठी भाजप आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. चिंचवड जागेसाठी काँग्रेस इच्छूक आहे. मात्र या जागांबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेऊ. कारण दोन्ही जागा भाजपसाठी अनुकूल नसल्याचे संजय राऊत म्हणाले. कसबा आणि चिंचवड जागेसाठी बिनविरोधचा नारा दिला तरी ही निवडणूक होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.


Full View

Tags:    

Similar News