Raj Thackeray birthday : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांचा सल्ला आणि खोचक टोला

राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या (Raj Thackeray birthday) निमीत्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुभेच्छा देतांना खोचक टोला लगावला आहे.;

Update: 2023-06-14 11:35 GMT

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री (Next CM) असे बॅनर लावले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्याविषयी विचारले असता, आव्हाड म्हणाले, राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मनापासून शुभेच्छा. सध्या त्यांचा एकच आमदार आहे. त्यामुळे 50-60 तरी वाढवायला पाहिजेत. त्याबरोबरच राज ठाकरे यांनी टोमणे आणि नकला यातून बाहेर पडून कृतीशील कार्य करावे. तसंच राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप तयार करावा. त्यांनी मी याला शेपटीला धरून आपटीन वैगेरे भाषा करू नये. त्यांनी याच्या त्याच्या नकला करत बसण्यापेक्षा पक्ष वाढवण्यासाठी काम करावे, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा रोड मॅप महाराष्ट्राला समजावून सांगावा. त्यातूनच राज ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Tags:    

Similar News