''यासाठी मी गद्दारी केली'' गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलं

जळगाव जिल्ह्यातील बिलखेडा गावात विविध विकास कामाचे उद्धाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गुलाबरावपाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.;

Update: 2023-02-25 06:37 GMT


जळगाव जिल्हयातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट कबुलीच दिली. विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचं नाही, अशी विरोधकांवर टिका केली. बिलखेडेमध्ये साधे एक शौचालय विरोधक बांधू शकले नाहीत. त्यांना आमच्याबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. असा टोला पाटील यांनी विरोधकांना लगावला.

भाषणं ठोकून इथे फक्त फुशारक्या मारण्याची कामं विरोधक करतात. मात्र आम्ही गेल्या आठ महिन्यात विकासावर भर देत, विकासाभिमुख कामे केली आहेत. आणि ते राज्यातील जनतेने पाहिले आणि पाहत सुद्धा आहे. तुम्ही काय आमच्यावर टिका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली, असं मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझ्यासह इतर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वच स्तरातून टिका करण्यात आली. मात्र आम्ही या टिकेला आमच्या कामातून राज्यातील जनतेला उत्तरे दिली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असून ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवला.

Tags:    

Similar News