जे पी नड्डा यांचा दावा फुस्सsss, मदुराई AIIMS अजूनही कागदावरच

केंद्र सरकार मदुराईमध्ये AIIMS रुग्णालय बांधणार होते. मात्र मदुराईमधील AIIMS रुग्णालयाची एकही वीट रचली नसल्याचे उघड झाल्याने भाजप अध्यक्ष जे पी नड्डा चांगलेच ट्रोल झाले आहेत.

Update: 2022-09-24 13:37 GMT

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मदुराई येथील AIIMS चे बांधकाम 95 टक्के पुर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल, असा दावा केला होता. जे पी नड्डा यांनी दावा केलेल्या ठिकाणी एकही वीट रचली नसल्याचे काँग्रेस खासदारांनी म्हटले आहे. त्यामुळे जे पी नड्डा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

तामिळनाडूतील मदुराईचे खासदार सु. व्यंकटेशन आणि बी. मनिकम टैगोर यांनी जे पी नड्डा यांनी केलेल्या थोप्पूर येथील एम्सच्या जागेला भेट दिली. यावेळी त्यांना तेथे एकही वीट रचली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी हातात फ्लेक्स घेऊन मदुराई एम्सची इमारत कुठे आहे? असा सवाल केला आहे.

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी मदुराई एम्सचे काम 95 टक्के पुर्ण झाल्याचा दावा केला होता. पण ही इमारत कुठे आहे? असा सवाल विचारतानाच खासदार बी. मनिकम टैगोर यांनी म्हटले की, आम्ही थोप्पूर येथील एम्सच्या नियोजित जागेला भेट दिली. त्याठिकाणी आम्ही एक तासभर एम्सची शोधाशोध केली. मात्र आम्हाला एम्सची एक वीटही रचल्याचे दिसले नाही, असे म्हटले आहे.

खासदार सु. व्यंकटेशन यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, अजूनपर्यंत एम्सची निविदाही निघाली नाही. मंत्रीमंडळात मंजूरही मिळाली नाही. मात्र तरीही भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी रुग्णालय 95 टक्के पुर्ण झाल्याचा दावा केला आहे. हे आश्चर्यकारक आहे. तसेच मुदुराई एम्ससाठी 1200 कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र आता तो खर्च 1900 कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे अजूनपर्यंत या जागेवर काहीही उभारण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे, असंही सु. व्यंकटेशन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

जे पी नड्डा ट्रोल

नितीन अग्रवाल या काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयकाने ट्वीट करत जुमला आणि रिएलिटी असे व्हिडीओ ट्वीट केले आहेत.

जे पी नड्डा यांनी केलेल्या दाव्यावरून मीम्स व्हायरल होत आहेत.

Tags:    

Similar News