कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची आमदार राजू पाटील यांच्याकडून पाहणी

निधी मंजूर होतात होर्डिंग लागतात ,पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी - राजू पाटील यांनी शिवसेनेवर टीका

Update: 2021-08-05 09:57 GMT

कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची आमदार राजू पाटील यांच्याकडून पाहणी

Inspection of Kalyan-Shil road work by MLA Raju Patil

निधी मंजूर होतात होर्डिंग लागतात ,पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी - राजू पाटील यांनी शिवसेनेवर टीका

कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी पलावा ते सुयोग हॉटेल चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी राजू पाटील यांनी वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना आपण एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना केल्याचे सांगितले. तर एमएमआरडीएने रस्त्यासाठी मंजूर केलेल्या 360 कोटीच्या निधीबाबत मंजुरी मिळते, होर्डिंग्ज लागतात मात्र, प्रत्येक्षात काम काही सुरू होत नाही.

एमआयडीसी मधील रस्त्याला 110 कोटीचा निधी मंजुर झाला त्याचा काय झालं? असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवत असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी यावेळी केला.

कल्याण -शीळ रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशचिन्ह उपस्थित होत असून याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी या रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, मात्र मंत्र्याचा , स्थानिक लोकप्रतिधीनींचा या सर्व गोष्टींना पाठिंबा असल्यानेच हे होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या रस्त्याच्या कामाबाबत कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी सांगितले की, रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी लवकरच दूर केल्या जातील. रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News