मोदी घाबरले !! दैनिक भास्कर वर छापेमारी सुरू

Update: 2021-07-22 06:16 GMT

Pegasus Spyware वरुन केंद्र सरकार संशयाच्या घेऱ्यात असताना आता देशातील प्रसिद्ध माध्यम समुह 'दैनिक भास्कर' वर केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे. दैनिक भास्करच्या विविध कार्यालयांवर इनकम टॅक्स विभागाने छापे टाकले आहेत. गुरूवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

दैनिक भास्करच्या देशभरातील विविध कार्यालयांवर इनकम टॅक्स विभागाच्या पथकांनी छापे टाकले आहेत. मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातील कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. या छापेमारी दरम्यान इनकम टॅक्सच्या पथकासोबत स्थानिक पोलीस असल्याचेही वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या दैनिकांच्या मालकांची याआधीच EDद्वारे चौकशी करण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्लीतील इनकम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांची टीमने ही छापेमारी केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला होता, याचे चित्र परखड़पणे मांडणाऱ्या माध्यमांपैकी दैनिक भास्कर समुह आघाडीवर होता. सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या दाव्यांची पोलखोल करणारी मालिकाच दैनिक भास्कर ग्रुपने चालवली होती.

या कारवाईवरुन सोशल मीडियावर केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे गौरव पांधी यांनी वास्तव मांडले म्हणून दैनिक भास्करवर कारवाई करण्यात आली, असा आरोप केला आहे.

तर न्यूजलाँन्डीच्या पत्रकार मनीषा पांडे यांनी दैनिक भास्करने आजच्या अंकात सरकारच्या ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याच्या दाव्याची पोलखोल केल्याचे व्टिट केले आहे.

Tags:    

Similar News