छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची 100 कोटींची संपत्ती जप्त

Update: 2021-08-25 03:38 GMT

महा विकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केली आहे. छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. छगन भुजबळ समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये किमतीच्या बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे. याआधीही छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली होती काही काळासाठी छगन भुजबळ हे तुरुंगात देखील गेले होते.

इन्कम टॅक्स विभागाने प्रसिद्ध पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी ही बेनामी संपत्ती कंपनीद्वारे खरेदी केली होती, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई सेशन्स कोर्टात यासंदर्भातले सुनावणी सुरू आहे तसेच या प्रकरणात भुजबळ दोषी आढळले तर त्यांना सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News