उल्हासनगरमध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; भाजपला दणका

Update: 2021-10-27 11:27 GMT

ठाणे :  उल्हासनगरमध्ये मनपात भाजपला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिल्याचे बोललं जात आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी पक्षप्रवेश केला. ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे -पलाघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला.

उल्हासनगरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, कलानी कुटुंबीयांसह अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून या सर्वांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उल्हासनगर पंचक्रोशीमध्ये ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags:    

Similar News