नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदी यांना सल्ला

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने मोर्चा उघडला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूरनंतर ही सभा मुंबईत पार झाली. यावेळी नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला.;

Update: 2023-05-02 03:00 GMT

राज्यात महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेचा धडाका लावला आहे. यामध्ये आधी छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सोमवारी मुंबई येथे ही सभा झाली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. मात्र पंतप्रधान मोदी यांना नाना पटोले यांनी सल्ला दिला.

नाना पटोले म्हणाले की, राजकीय जीवनात असताना शिव्या या खाव्याच लागतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी शिव्यांचे राजकारण करू नये, असाही सल्ला नाना पटोले यांनी दिला.

शिव्यांचं राजकारण आणि सल्ला

कर्नाटकच्या निवडणूकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुध्द काँग्रेस असा सामना रंगला आहे. त्यातच मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना विषारी साप असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, 2014 पासून काँग्रेसने मला 91 शिव्या दिल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले होते. तुम्ही शिव्यांचे राजकारण करत आहात. माझ्या भावाकडून शिका. कारण तुम्ही त्याला इतक्या शिव्या देता तरी तो त्या पचवून पुढे चालत राहतो. त्यापाठोपाठ नाना पटोले यांनीही नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. राजकारण शिव्या या खाव्याच लागतात, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Full View

Tags:    

Similar News