देशातील अनेक नामांकित विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदं रिक्त आहेत. मात्र भाजप नेत्यांकडून शिक्षणाबाबत मोदी सरकार किती सकारात्मक आहे? याविषयी डांगोरा पिटला जात आहे. भाजप खासदारांनी सांगितले की, मोदी सरकारने किती IIT, IIM च्या इमारतींचे बांधकाम केले. मात्र औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देशातील IIT आणि IIM सह महत्वाच्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची पदं रिक्त असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, देशातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये 6 हजार 180 प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत. यावेळी इम्तियाज जलील म्हणाले, इमारते बनाने से तालीम नहीं पहुँचाई जा सकती है, उसके लिए आपको लेक्चरर की जरुरत आहे, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीकास्र सोडले.