औरंगाबादच्या नामांतराविरोधात रस्त्यावर उतरा, इम्तियाज जलील यांचे आवाहन

ठाकरे सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय स्थगित करून पुन्हा नव्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून जलील यांनी टीका केली आहे.;

Update: 2022-07-17 07:17 GMT

ठाकरे सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय स्थगित करून पुन्हा नव्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून जलील यांनी टीका केली आहे.

ठाकरे सरकारच्या जुनाच निर्णय नव्याने घेत शिंदे-फ़डणवीस सरकारने औरंगाबाचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे. त्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त करत औरंगाबादमधील नागरिकांना नामांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.

इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात शहरातील विविध राजकीय संघटना सामाजिक संघटना आणि नागरिकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन देऊन विरोध करावा. तसेच नागरिकांनी आता रस्त्यावरच्या आणि कायदेशीर लढाईसाठी तयार रहावे, असे आवाहन केले.

इम्तियाज जलील म्हणाले की, कोणत्याही शहराचे नाव बदलताना त्या शहरातील नागरिकांच्या त्या शहराच्या नावाशी भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे शहराचे नाव बदलण्याला विरोध करण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित यावे. हा हिंदू मुस्लिमांचा मुद्दा नाही तर शहराच्या अस्मितेचा मुद्दा असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. तर त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करताना म्हणाले की, सेना भाजप आणि मोठी शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांनी शहराचा विकास सोडून औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या भावना समजून न घेता औरंगाबाद शहराचे नामांतर केले आहे. याचा विरोध सर्व सामान्य नागरिकांनी करावा. तसेच नागरिकांनी विरोध करण्यासाठी दुकानं बंद ठेऊन रस्त्यावर उतरावे आणि प्रशासनाला निवेदन द्यावे. तसेच हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर तेथे जनतेचा विरोध किती आहे हा मुद्दा लक्षात घेतला जाईल, असेही जलील म्हणाले.

Full View

Tags:    

Similar News