पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात सावरगाव येथे महादेव जानकर, खा. डॉ. प्रितम मुंडे, खा. सुजय विखे पाटील उपस्थित आहे. य़ा मेळाव्यात बोलताना महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर नसतील तर भाजपचं काही खरं नाही असं वक्तव्य केलं.
महादेव जानकर यांनी बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आशिर्वाद आणि पंकजा मुंडे ची युक्ती मुळे गर्दी या दसरा मेळाव्याला असते. सुजय विखे पाटील आणि प्रितम मुंडे यांनी आमचा शब्द दिल्लीला न्या. पंकजा मुंडे ला महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान द्या. पंकजा मुंडे या आपल्या असेट आहेच आणि आपण त्यांना जपलं पाहिजे. कारण पंकजा मुंडे आणि महादेव जानकर नसतील तर भाजपचं काही खरं नाही असं वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केलं आहे.
मी भाजपचा नाही, मी मित्रपक्ष- महादेव जानकर
आमचा शब्द दिल्लीला घेऊन जा आणि मोदींना सांगा पंकजा मुंडे यांना मंत्रीपद द्या म्हणून- महादेव जानकर