...तर शिवेंद्रराजेंची शिफारस मी स्वतः पवार साहेबांकडे करु शकलो- शशिकांत शिंदे

Update: 2021-12-07 03:46 GMT

सातारा : जिल्हा बँकेची अध्यक्ष निवड संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत होती.त्यात आ.शशिकांत शिंदेंचा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडीमध्ये जास्त ट्विस्ट आले होते. भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती. मात्र , शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नितीन पाटील यांना जिल्हा बँकेच अध्यक्ष बनवलं.

जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांना शशिकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या असून जिल्हा बँकेमध्ये नेहमीच पक्ष विरहीत कामकाज चालतं असं त्यांनी सांगितले. स्व. लक्ष्मणतात्या पाटील यांनी पक्षाशी बांधीलकी ठेवत शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण केली होती, त्यामुळे त्यांच्या मुलाला अध्यक्ष बनविलं याचा आनंदच असुन कार्यकर्त्यांचे सुद्धा समाधान झालं असेल असं शशिकांत शिंदे म्हणाले.

माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि याच पवार साहेबांनी ओळखल्या त्यामुळेच नितीन पाटील यांना अध्यक्ष बनविल्याचे त्यांनी बोलून दाखवले. शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे यांच्या विरोधात खोचक वक्तव्य केलं असुन मी निवडुन आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो या आधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांच्याकडे मीच शिफारस केली होती. असं शिंदे यांनी म्हटले.

Tags:    

Similar News