माफी मागणार नाही,आमदार शिरसाठ आपल्या विधानावर ठाम; ग्रामसेवकांना म्हणाले होते भामटे

Update: 2021-11-11 03:25 GMT

औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात बोलताना ग्रामसेवकांना भामटे म्हणाले होते. त्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत असून, राज्यभरातील ग्रामसेवक आक्रमक झाले आहेत. मात्र आमदार शिरसाट हे आपल्या मतावर ठाम असून, 'मी माफी मागणार नाही' असं सिरसाठ म्हणाले आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या महिला सरपंच परिषद दरम्यान आपल्या भाषणात शिरसाठ यांनी राज्यातील ग्रामसेवकांबाबत वादग्रस्त वक्तव्य करतांना, 'एक सांगतो कधीच ग्रामसेवकाच्या नादी लागू नका, कारण सगळ्यात भामटा ग्रामसेवक असतो ,तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही' असे विधान केले होते.

शिरसाठ यांनी केलेल्या या विधानानंतर राज्यभरातील ग्रामसेवक संघटनांनी ठीक-ठिकाणी शिरसाठ यांच्या विधानाच निषेध करत निदर्शने केली होती. तर शिरसाठ यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणीही केली होती. मात्र आपण मागणार नसून,मी काहीही चुकीचे बोललो नसल्याचं शिरसाठ माध्यमांना बोलतांना म्हणाले आहे.

Tags:    

Similar News