मी भाजपात ही माझी अडचण, नारायण राणे यांची फडणवीस यांच्यासमोर खंत

मी भाजपात आलोय. ही माझी अडचण आहे, असं मत नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच व्यक्त केले.;

Update: 2023-02-05 03:01 GMT

कोकणासाठी उध्दव ठाकरे यांनी काय केलं? असा सवाल करत नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला. यावेळी नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे बोलत होते.

नाराण राणे म्हणाले (Narayan Rane), शिवसेना (Shivsena) वाढवायला, घडवायला आणि सत्तेत यायला खरा आधार कुणी दिला असेल तर तो कोकणाने दिला. नारायण राणे यांनी आधार दिला असं मी म्हणत नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) वणवण फिरणारा कोकणी माणूसच होता. मग अडीच वर्षे सत्ता असताना कोकणासाठी काय केलंस रे बाबा? असा सवाल नारायण राणे यांनी केला. एवढंच नाही तर फक्त दोन वेळेस मासे खायला आलास असा एकेरी उल्लेख करीत नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडले.

खरं तर शिवसेनेने कोकणात कोणताच विकास केला नाही. कोकणात कुठला प्रकल्प आला तर शिवसेना त्याला विरोध करायची. एन्रॉन प्रकल्प कोकणात आला त्यावेळी शिवसेनेने विरोध केला. पण हा प्रकल्प झाला. त्यावेळी सगळ्यात जास्त कामं ही शिवसेनेच्या लोकांनाच मिळाले. राजन साळवी त्यावेळी कंत्राटदार होते. ते आता आमदार झाले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

कोकणासाठी काम करायचं नाही, कुणाला मदत करायची नाही, कुणाच्या घरात अन्न शिजतंय की नाही, हे बघायचं नाही. मग मला सांगा आताच्या शिवसेनेतील नेत्यांना तुम्ही पाच किलो तरी धान्य दिलंय का? असा सवाल नारायण राणे यांनी व्यक्त केला.

कोकणात कुपोषण वाढतंय. या भागात कुपोषित बालकं आहेत. हे कुपोषण निर्मूलन करण्याची घेतलीय का? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, त्यांना असं काही करायचं नसतं. त्यांना फक्त नारायण राणे यांच्यावर टीका करायची असते. त्यांनी सांगावं, कधी बालवाडी, शाळा, कॉलेज तरी काढलंय का? असा सवाल करत केवळ सरकारच्या पैशावर नाही, तर आमच्या पैशातूनही काम केलं असा दावा नारायण राणे यांनी केला.

यावेळी नारायण राणे म्हणाले, मी ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. जे द्यायचे असतील ते त्यावेळी देईल. हे सगळं मी सहन करतोय. कारण मी भाजपात आलोय. त्यामुळे मी भाजपात आलोय हीच माझी अडचण आहे. भाजपात सहनशील आणि शांत लोक आहेत. त्यामुळे मीसुध्दा सगळं सहन करत असल्याचे नारायण राणे म्हणाले. मात्र माझ्या सहनशीलतेचा कुणीही फायदा घेऊ नका, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. 

Tags:    

Similar News