देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील एका गंभीर प्रकरणाच्या चौकशीला राज्य सरकारने सुरुवात केली आहे.;
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगचा मुद्दा गाजला होता. याप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. त्यानुसार आता फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती संपूर्ण चौकशी करून तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. समितीमध्ये पोलीस महासंचालक यांच्यासह राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त आणि मुंबई विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सदस्य म्हणून काम करणार आहेत.