प्राध्यापक व ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरकेंची सरकारवर टीका
राज्यात विविध मुद्यावर सरकार काहीही बोलण्यास तयार नाहीत. आपल्या सोयीप्रमाणे काम सुरु असल्याची टिका प्राध्यापक हरी नरके यांनी केली आहे.;
राज्याचील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, निवडणुका वेळेवरती घेणे हे घटनात्मक बंधन आहे. मात्र, राजकीय परिस्थिती आपल्याला सोयीची व्हावी यासाठी राज्यातील केंद्रातील सरकारचे सर्व प्रयत्न सुरु असल्याचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरके यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांना म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असे वाटत नाही की, आपण सुरक्षित आहोत. आणि आगामी निवडणुकीत आपण विजयी बहुमताने विजयी होवू शकतो. ही सुरक्षितता तोपर्यंत वाटत नाही तोपर्यत निवडणूका लांबवल्या जातील, अशी शक्यता नरके यांनी व्यक्त केली. ते कल्याण येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे. प्रेरणा न घेता ठराविक धर्माच्या विरुद्ध किंवा ठराविक समाजाच्या विरुद्ध शिवाजी महाराजांचा वापर करणे दुर्दैवी असल्याचे मत नरके यांनी यावेळी व्यक्त केले. पुढच्या काळात कुठेतरी व्यापक शिवाजी महाराज मानले जाणे, हे तरुण पिढीसाठी आवश्यक आहे असे हरी नरके यांनी यावेळी सांगितले. राज्यपालाची हकालपट्टी झाली याचा आनंद असल्याचे सांगत नरके यांनी हे फक्त त्यांच्यापुरते नाही, अशी विधाने करणाऱ्या सर्वांचीची हाकालपट्टी राज्यातून झाली पाहिजे, असे मत हरी नरके यांनी मांडले.
मी टिळकांचा सन्मान करतो. मी टिळकांबद्दल आदर बाळगतो. पण टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला नसून, तो त्यांनी मोठा केलेला आहे. तो त्यांनी देशभर पोचलेला आहे. बजेटमध्ये फक्त मित्रांचा विकास मित्रांचे भले व्हावे आणि सामान्य माणसाला काही मिळू नये, अशा प्रकारची तरतूद करण्यात आल्याची टिका प्राध्यापक हरी नरके यांनी केंद्र सरकारवर केली.